Last Updated: Monday, March 10, 2014, 21:41
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावात दोन वनरक्षकांवर बिबट्यानं हल्ला केलाय. काल गावात बिबट्या आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर वनखात्यामार्फेत बिबट्याचा शोध सुरु होता.
पहाटे सुरेश उपरे आणि तौफीक मुल्ला हे वनरक्षक बिबट्याचा शोध जंगलात घेत होते. त्यावेळी अचानक या दोघांसमोर बिबट्या आला. काही क्षणात त्यानं तौफीक यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या खांद्यावर बिबट्यानं हल्याचा प्रयत्न केला. आपल्या सहकाऱ्यावर हल्ला झालाय हे पाहत असलेल्या सुरेश यांनी दांड्याच्या सहाय्यानं बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्यानं सुरेशवरही हल्ला केला. त्याच्या हातावर या बिबट्यानं हल्ला केला.
मात्र, बिबट्याने हल्ला केल्यानंतर या दोघांनी दंडूक्याच्या सहाय्यानं बिबट्याला हुसकावून लावलंय. झालेल्या प्रकारात वनखात्याचे हे दोन्ही कार्मचारी गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आलंय.
बिबट्याच्या हल्यात या दोन कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर, पाठीवर आणि हातावर बिबट्याच्या पंज्याच्या खुणा आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 10, 2014, 21:41