Last Updated: Thursday, August 22, 2013, 17:43
www.24taas.com, झी मीडिया, वसईवसईतील दुहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडण्यात मणिकपूर पोलिसांना काही अंशी यश आलंय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
ज्या फार्म हाऊसवर हत्याकांड झालं होतं त्या मालदिव फार्म हाऊसचा मालक रमेश निजाई आणि त्याचा कर्मचारी सुरज लीनबहादूर बिका या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा आरोप असून यात अजून एक आरोपी फरार आहे. जोसेफ साळवे आणि प्रियांका मोहिते या दोघांचे मृतदेह गास रोडवरील निर्जन रस्त्यावर फेकण्यात आले होते.
या जोडप्याचा खून कुणी केला याचा अजून उलगडा झालेला नसला तरी ज्या फार्म हाऊसवर यांचा खून झाला त्याचा शोध लागल्याने आता तपासाला अधिक गती मिळण्याची आशा आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 22, 2013, 17:43