बिहार पोलिसाची हत्या करणाऱ्या नराधमांना कल्याणमध्ये अटक Bihar police`s murderers arrested

बिहार पोलिसाची हत्या करणाऱ्या नराधमांना कल्याणमध्ये अटक

बिहार पोलिसाची हत्या करणाऱ्या नराधमांना कल्याणमध्ये अटक
www.24taas.com, ठाणे

एका बिहार पोलिसांची त्यांच्या पिस्तूलातून गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या चार नराधमांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय. गुन्हा करण्यासाठी या आरोपीने गंगेश कुमार याची पिस्तूल चोरून त्याची 31 डिसेंबरला हत्या केली.

हत्येनंतर हे आरोपी शिर्डीला पळून आले होते. मात्र त्यांचे पैस संपल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून बॅकेत पैस टाण्यासाठी सांगितले होते. त्या बँक खात्याची माहिती घेऊन आरोपींचा शोध सुरु केला. अखेर शुक्रवारी पहाटे कल्याण रेल्वेस्थानकाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली.

या कारवाईत बिहार आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ठाण्यातील ग्रामीण पोलिसांना मदत केली आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी बिहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. या आरोपींवर खून, दरोडा, जबरी चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

First Published: Sunday, January 6, 2013, 20:45


comments powered by Disqus