Last Updated: Saturday, June 1, 2013, 15:11
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेठाण्यातल्या बिलाबाँग शाळेच्या बसची मनसैनिकांनी तोडफोड केली आहे. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. मनसेनं शाळेवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे. बिलाबाँग शाळेनं काही दिवसांपूर्वी दोन पालकांच्या विरोधात पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
या पालकांनी फि वाढीच्या विरोधात आंदोलन केल्यानं शाळेची बदनामी झाली, असा दावा बिलाबाँगच्या व्यवस्थापनानं केला आहे. शाळेच्या या भूमिकेवर पालकांमध्ये संतापाची भावना आहे.
ठाण्यातील श्रीनगर परिसरातील इंटरनॅशनल बिलाबाँग शाळेत झालेल्या फी वाढीविरोधात प्रताप सरनाईक यांनीही शिक्षण मंत्र्यांना निवेदन सादर केलं होतं. त्यानंतर, ताबडतोब शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना फि वाढ स्थगित करण्याचे आदेश दिले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 1, 2013, 14:53