Last Updated: Thursday, December 19, 2013, 20:49
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात तोरणा भाटी परिसरात अतिशय दुर्मिळ जातीचा काळा बिबट्या आढळला आहे. गावकऱ्यांना सकाळपासून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या, मात्र त्याचा मागमूस लागत नव्हता. अचानक काही गावक-यांना तो विहिरीत पडलेला दिसल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
हा बिबट्या कोकणात आढळणाऱ्या नेहमीच्या बिबट्यापेक्षा वेगळा होता. याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. अवघ्या पाऊण तासात वनविभागाने तत्परतेने कारवाई करत विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढलं. अशा प्रकारचा बिबट्या आढळल्याचं अनेकदा गावकऱ्यांनी सांगितलं होतं.
मात्र प्रत्यक्षात पुरावा मिळाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा बिबट्या दोन वर्षांचा आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या दुर्मिळ बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात लवकरच सोडण्यात येणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Thursday, December 19, 2013, 18:43