पुन्हा एकदा... एकतर्फी प्रेम अन् ब्लेडनं वार, blade attack on girl in thane

एकतर्फी प्रेम अन् 'ती'च्यावर ब्लेडनं वार

एकतर्फी प्रेम अन् 'ती'च्यावर ब्लेडनं वार
www.24taas.com, ठाणे

अवघा देश नव्या वर्षांच्या स्वागतासाठी सज्ज असताना ठाण्यामध्ये पुन्हा एका मुलीला पुरुषी अहंकाराला बळी पडावं लागलंय. एका माथेफिरु तरुणानं तरुणीवर ब्लेडने वार केल्याची घटना ठाणे स्टेशनवर घडलीय.

ठाणे रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून तरुणानं तरुणीवर हा हल्ला केला. रात्री दहाच्या सुमारास पीडित तरुणी कामावरुन घराकडे परतत होती. यावेळी रेल्वे पुलावर माथेफिरु तरुणानं तिला अडवून तिच्यावर ब्लेडनं वार केले. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तिच्यावर वार केल्यानंतर या माथेफिरू घटनास्थळावरुन बाजूला जात तरुणानं स्वत:ही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेनंतर दोघांनाही हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.

First Published: Tuesday, January 1, 2013, 10:19


comments powered by Disqus