ठाण्यात इमारतीला आग, दोघांचा मृत्यू, दोन जखमीbuilding catch fire in Thane, 2 dead, 2 Injured

ठाण्यात इमारतीला आग, दोघांचा मृत्यू, दोन जखमी

ठाण्यात इमारतीला आग, दोघांचा मृत्यू, दोन जखमी
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाण्यातल्या समतानगरमध्ये सुंदरबन पार्क या इमारतीला लागलेल्या आगीत २ जेष्ठ नागरीकांचा होरपळून मृत्यू झालाय. सकाळी सहाच्या सुमारास ही आग लागली. इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली होती.

अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर ही आग विझवली.

शिवाजीराव चौगुले आणि निर्मला चौगुले या दोघांचा या आगीत होरपळून मृत्यू झालाय. तर विक्रमादित्य सावे आणि रंजना सावे या दुर्घटनेत जखमी झालेय. त्यांना ठाण्यातल्या सिव्हिल लाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

आगीचं कारण अद्याप कळलं नाहीय. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 16, 2014, 09:07


comments powered by Disqus