Last Updated: Saturday, September 21, 2013, 11:37
ww.24taas.com, झी मीडिया, ठाणेसर्वाधिक अनधिकृत बांधकामे असलेल्या मुंब्रा भागात आज शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत जिवीतहानी झाल्याने वृत्त नाही.
मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ ही इमारत आहे. काही जण इमारतीच्या ढिगा-याखाली अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंब्रा रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या या इमारतीच्या डागडुजीचे काम सूरू होते.
ढिगाऱ्याखाली एक ते दोन जण अडकल्याची शक्यता आहे. पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून ढिगाऱ्या उपासण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही महिन्यात मुंब्र्यामध्ये अनधिकृत इमारती कोसळडून झालेल्या दुर्घटनांमध्ये ८० हून अधिक जणांचा बळी गेला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, September 21, 2013, 11:37