Last Updated: Saturday, June 22, 2013, 14:00
www.24taas.com, झी मीडिया, दहिसरदहिसरमध्ये इमारत कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना भगवती रुग्णालयात दाखल केलं आहे.
दहिसर पुर्वेला असणारी ‘पियुष’ ही चार मजली इमारत आज कोसळली. या इमारतीमधील रहिवाशांना यापूर्वीच दुसरीकडे हालवण्यात आलं होतं. मात्र सोसायटीचा वॉचमन आणि त्याचं कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.
पावसामुळे मुंबईतील इमारत कोसळण्याची ही या आठवड्यातील तिसरी घटना आहे. कालच मुंब्र्यामधील ‘स्मृती’ ही ३ मजली इमारत कोसळली होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, June 22, 2013, 10:10