Last Updated: Sunday, May 25, 2014, 10:08
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई कणकवली-मुंबई रातराणी एसटी बसला झालेल्या अपघातामध्ये 30 जण जखमी झालेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही.
खेडजवळच्या भोस्ते घाटात हा अपघात झाल्याची माहिती आहे. या बसमध्ये एकूण 47 प्रवासी होते. सर्व जखमींना खेडच्या कळंबनी रुग्णालयात तसंच देवगडच्या वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. त्यामुळे, ही गाडी रस्ता सोडून बाजुच्याच 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 25, 2014, 10:08