Last Updated: Sunday, October 28, 2012, 17:58
www.24taas.com,वसईवसईत इलेक्ट्रिक केबलचा शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सुमित जाधव असं या मुलीचं नाव आहे. वसईच्या सनसिटी ग्लास रोडलगतच्या नाल्यात ही दुर्घटना घडली आहे.
वसईतील उघड्या नाल्यावर मासे पकडण्यासाठी सुमित त्याच्या मामासोबत गेला होता. मात्र, या नाल्यातील एका लोखंडी पाईपमधून स्ट्रीट लाईटची केबल टाकण्यात आलीये. हातपाय ओले असल्याने शॉक बसून सुमितचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी मॉर्निंग वॉकला जाणा-या लोकांनी सुमितला पाहिलं. त्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी विद्युतपुरवठा बंद करून सुमितचा मृतदेह बाहेर काढला. या गलथान कारभाराबाबत परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
First Published: Sunday, October 28, 2012, 17:54