रत्नागिरीत कृषी अधिकाऱ्यांची गंडवागंडवी, cheesiness Agricultural Officer in Ratnagiri

रत्नागिरीत कृषी अधिकाऱ्यांची गंडवागंडवी

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात अर्जुना धरणाच्या कालव्यासाठी संपादित केलेल्या बागायती जमिनीचा मोबदला अनोखी शक्कल वापरुन लाटण्यात आला. संपादित केलेली जमीन बागायती आहे आणि त्या जमिनीत काजूची दहा ते बारा वर्षांची कलमं असल्याचा बनाव सातबारा उतारा रंगवून दाखवण्यात आलाय.

गावातल्या नंदकुमार शेट्ये या व्यक्तीनं ६५ लाख आणि ८५ लाखांचा मोबदला पदरात पाडून घेतला. या वृत्ताची दखल घेवून प्रशासनानं फेर चौकशीचे आदेश दिले खरे मात्र चौकशी हा सुद्धा एक बनाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

मोबदल्यासाठी बागायतीची मोजणी ज्या कृषी सहाय्यकांनं केली त्यालाच पुन्हा चौकशी समितीचाच मोरक्या बनवून पाठवण्याचा घाट कृषी खात्यानं घातलाय. त्यामुळे कृषी खात्याच्या या बनावाबाबत संताप व्यक्त होत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 18:24


comments powered by Disqus