Last Updated: Sunday, July 21, 2013, 08:32
www.24taas.com, झी मीडिया, ऐरोली ऐरोलीत रहाणारा त्र्यंबक खेरनार उर्फ छोटू माळी याच्यावर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यात छोटू माळी याचा मृत्यू झालाय.
खुनाच्या प्रकरणात छोटू माळीला शिक्षा झाली होती. मात्र, सध्या तो पॅरोलवर सुटला होता आणि व्याजावर पैसे देण्याचा धंदा करत होता. त्याच्यावर खून आणि खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी ऐरोली सेक्टर तीन मधील ममता बारच्या बाहेर त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. एका खूनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला माळी पॅरोलवर सुटून आल्यानंतर त्याच्यावर हा हल्ला करण्यात आलाय.
हल्ल्यानंतर माळीला तात्काळ क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हा हल्ला कोणी केला याचा पोलीस शोध घेत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, July 21, 2013, 08:32