कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, Christamas Specials and Additional coaches to Janshatabdi

कोकण रेल्वे मार्गावर नाताळ, नववर्षासाठी विशेष गाड्या

कोकण रेल्वे मार्गावर नाताळ, नववर्षासाठी विशेष गाड्या
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नाताळ आणि नववर्षासाठी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतलाय. तसेच जनशताब्दी एक्सप्रेसला जादा डबे जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.

०९००९/०९०१० बांद्रा टरर्मिनस - मडगाव - बांद्रा टरर्मिनस अशी सुपरफास्ट गाडी दोन्ही मार्गावर चालविण्यात येणार आहे. दि. २४ आणि ३१ डिसेंबर रोजी ही गाडी बांद्रा येथून रात्री १२.१५ वाजता सुटेल. मडगावला दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. तसेच ०९०१० ही गाडी मडगाववरून २४ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी रात्री ८.०० वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी बांद्रा येथे सकाळी १०.३० वाजता पोहोचेल.

या गाडीला १८ डबे असतील. ही गाडी बोरीवली, वसईरोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविंम या स्थानकावर थांबेल.

जनशताब्दी गाडीला अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. या गाडीला दि. २५ डिसेंबर २०१३ ते १५ जानेवारी २०१४ दरम्यान हे अतिरिक्त डबे असणार आहेत. १२०५१/ १२०५२ दादर-मडगाव-दादर जनशताब्दी गाडी सोडण्यात येणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 21, 2013, 21:42


comments powered by Disqus