Last Updated: Wednesday, January 9, 2013, 07:51
www.24taas.com, नवी मुंबई `सिडको`नं आपली नवी योजना जाहीर करत सर्वसामान्यांना थोडा दिलासा दिलाय. नवी मुंबईत खारघर परिसरात सिडको ५६६० घरे बांधणार आहे. सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आलाय.
अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्यांसाठी ५ हजार ६६० घरांना मंजूरी मिळालीय. या योजनेसाठी ५५० कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता देण्यात आलीय. खारघरला ही घरं उभारण्यात येणार आहेत. २६ जानेवारीपासून या कामाला सुरुवात होणार आहे. २७ महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार आहे.
सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी ही माहिती दिलीय. याचे अर्ज लवकरच निघणार असून लॉटरी पद्धतीनं घरांचं वाटप करण्यात येणार आहे.
First Published: Wednesday, January 9, 2013, 07:48