क्लस्टर डेव्हलपमेंट : श्रेयासाठी ठाण्यात पोस्टरबाजी, Cluster Development: Thane in the poster for cr

क्लस्टर डेव्हलपमेंट : श्रेयासाठी ठाण्यात पोस्टरबाजी

क्लस्टर डेव्हलपमेंट : श्रेयासाठी ठाण्यात पोस्टरबाजी
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाणे आणि नवी मुंबईमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना लागू झाल्या नंतर ठाण्यात राजकीय बॅनरबाजीला सुरुवात झालीये. राज्य सरकारने जरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून क्लस्टरला मंजुरी दिली असली तरी शहरातील बॅनरबाजीबाबत सर्वसामान्य ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये २०००पूर्वीच्या झोपड्या कायम करणे तसेच क्लस्टरबाबत घोषणा केल्या नंतर ठाण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं जल्लोष करून स्वागत केलंय. ठाण्यात ठिकठिकाणी श्रेयाचे बॅनेर झळकू लागले आहेत.

ठाण्यातील आघाडी आणि युतीच्या बॅनरबाजी बाबतीत सर्व सामान्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नी संघर्ष केल्यामुळे सर्व सामान्य जनेतला न्याय मिळून दिल्याचं ठाण्यातील राजकारणी सांगतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 09:31


comments powered by Disqus