Last Updated: Friday, October 12, 2012, 19:27
www.24taas.com,ठाणेठाण्यात शिवसेना-काँग्रेस मैत्रीचे दावे संपुष्टात आलेत. लोकशाही आघाडीनं स्थायी समितीच्या सभापतीपदाचा फॉर्म काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांनी भरलाय.
लोकशाही आघाडीने शिवसेनेला झटका दिला आहे. तर राष्ट्रवादीने मनसे ऐवजी काँग्रेसला पाठिंबा देऊन नवी खेळी खेळली आहे. ही राजकीय खेळी स्थायी समिती निवडणुकीसाठी करण्यात आली. काँग्रेसचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ठाण्यात सेना-काँग्रेस मैत्री संपुष्टात आली आहे.
राष्ट्रवादीनं मनसेऐवजी काँग्रेसला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ख-या अर्थानं लोकशाही आघाडीचा हा शिवसेनेला झटका मानला जातोय. तर हा मनसेबरोबर विश्वासघात असून आम्ही दिलेला शब्द पाळतो. मात्र आघाडीत ते दिसत नसल्याची टीका शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केली आहे.
या नव्या राजकीय नाट्यानंतर आमची फसगत झाली नसून स्थायी समितीचा वाद मिटावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं मनसे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी म्हटलंय.
First Published: Friday, October 12, 2012, 18:54