Last Updated: Tuesday, October 23, 2012, 16:26
www.24taas.com, ठाणेकल्याण डोंबिवली महापालिकेची वादग्रस्त ठरलेल्या बीएसयुपी योजनेतील सदनिकांच्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडतोय.
बीएसयुपी योजनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली असतानाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिका वाटपाचा सोहळा पार पडतोय. डोंबिवली पूर्वेतल्या आंबेडकर नगरमध्ये या योजनेंतर्गत सदनिका बांधण्यात आल्यात.
मात्र या योजनेसंदर्भात कोणतीच माहिती देत नसल्यानं हायकोर्टात याचिका दाखल करण्य़ात आलीये. प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेच्या लाभार्थ्यांना सदनिका दिल्या जात असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
First Published: Tuesday, October 23, 2012, 16:26