नगरसेविकेच्या पती आणि मुलाची तरूणाला मारहाण, Corporater husband and son beaten to boy

नगरसेविकेच्या पती आणि मुलाची तरूणाला मारहाण

नगरसेविकेच्या पती आणि मुलाची तरूणाला मारहाण
www.24taas.com, वसई

वसईत नगरसेविकेचा पती आणि मुलाची दबंगई समोर आली आहे. नगरसेविकेचा पती आणि मुलानं एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

नगरसेविका सुषमा ठाकूर यांच्या पती आणि मुलानं हा प्रताप केला आहे. यांत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तरुणानं केला आहे. त्यामुळे नगरसेविकेचा पती आणि मुलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहे.

या दोघांविरोधात मॅनग्रोव्हज तोडल्याची तक्रार केल्याचा राग मनात ठेवून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप या तरुणानं केला आहे.. या घटनेनंतर नगरसेविकेचा पती आणि मुलगा फरार झाले आहेत.

First Published: Tuesday, March 12, 2013, 17:12


comments powered by Disqus