Last Updated: Tuesday, January 29, 2013, 18:38
www.24taas.com, नवी मुंबईनवी मुंबईमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळालाय. हा मृतदेह संगीतकार जतीन-ललितच्या बहिणीचा असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
संध्या जयप्रकाश सिंह असं मृत महिलेचं नाव आहे. संध्या गेले 15 दिवस बेपत्ता होत्या. १३ जानेवारीला त्या दागिने ठेवण्यासाठी नेरूळमधल्या अभ्युदय बँकेत जात होत्या. पण त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. त्यांचा उरण भागातून शेवटचा संपर्क झाला होता. बँकेत जाताना त्यांच्याकडे २० लाखांचे दागिने होते, परंतु त्यानी ते बँकेत भरले नाही. त्यामुळे घातपात झाल्याचा संशय आहे.
संध्या या कस्टम अधिकारी जयप्रकाश सिंग यांच्या पत्नी होत्या. त्या बेपत्ता झाल्यावर जयप्रकाश यांनी संध्या यांची माहिती देणा-याला ५० हजारांचं बक्षीस जाहीर केलं होतं. पण अखेर संध्या यांचा मृतदेह मिळाल्यानं कुटुंबीयांवर शोककळा पसरलीय.
First Published: Tuesday, January 29, 2013, 18:38