Last Updated: Wednesday, January 30, 2013, 16:27
www.24taas.com, ठाणेउपचारासाठी दाखल असलेल्या ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ठाणे सेशन कोर्टानं ही शिक्षा सुनावली. विशाल वणे असं या डॉक्टरचं नाव आहे. वाशी येथील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.
१६ ऑक्टोबर २०१० रोजी नवरात्रनिमित्त पीडित महिला पती आणि मुलांसमवेत वाशीतीली मॉर्डन कॉलेजच्या मैदानावर दुर्गापुजेसाठी आली होती. मात्र तिथं अस्वस्थ वाटू लागल्यावर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या दिवशी रात्री विशाल वणे हा रात्रपाळीच्या सेवेत होता.
पेशंटला गरज नसताना गुंगीचे इंजेक्शन देऊन वणे यांनं महिलेवर बलात्कार केला. घटनेच्यावेळी महिलेचा पती आयसीयू कक्षाबाहेर झोपला होता. अर्धवट गुंगीत असलेल्या महिलेनं सकाळी हा प्रकार पतीला सांगितला. त्यानतंर वाशी पोलिसांनी आरोपी डॉ. विशाल वणेला अटक केली होती.
First Published: Wednesday, January 30, 2013, 16:23