अभिनेता मोहनीश बहलच्या बंगल्यात मृत बाळ, Dead Body Of Small Girl Found At Monish Bhel Farm House

अभिनेता मोहनीश बहलच्या बंगल्यात मृत बाळ

अभिनेता मोहनीश बहलच्या बंगल्यात मृत बाळ
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

अभिनेता मोहनीश बहलच्या ठाण्यामधल्या बंगल्यात एक दिवसाचं मृत बाळ सापडलंय. स्विमिंग पूलमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. ठाण्यातल्या मुंब्रा-कळवा रोडवर हा बंगला आहे. या संदर्भात अभिनेता मोहनिश बहल यानं धाव घेतली.

पारसिक डोंगरावरील बंगल्याच्या आवारातील स्वीमिंग पूलमध्ये नवजात अर्भकाचा मृतदेह शनिवारी सापडला. स्त्री जातीचे हे मृत अर्भक अंदाजे २ ते ३ दिवसांचे असावे, असा पोलिसांचा अंदाज असून ते प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवल्याने कुजलेल्या स्थितीत आढळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा बंगला दिवंगत अभिनेत्री नूतन यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरक्षारक्षकाला सकाळी स्वीमिंग पुलमध्ये पिशवी तरंगताना दिसली. अर्भकाच्या शरीरावर कोठेही जखमा आढळल्या नसल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नूतन यांचे पुत्र व अभिनेते मोहनिश बेहल हेदेखील तिथे दाखल झाले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, February 22, 2014, 23:33


comments powered by Disqus