Last Updated: Monday, April 15, 2013, 07:25
www.24taas.com, ठाणे कल्याणमधील उल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मांजर्ली गावात ही घडली.
मांजर्ली गावातील शाम गायकर, बाबू गायकर यांची ही मुले असून नदीवर मंडपाचे कपडे धुण्यासाठी बरोबर गेले असता चौघे आंघोळ करीत असता पाण्याचा अंदाज न मिळाल्याने तिघेजण जागीच बुडाले तर एक मुलगी बचावली.
आईवडिलांची ही एकुलती एक मुले असून साहिल हा मुलगा सुट्टीत मामाकडे आला होता. स्वप्नील हा मुलगा अजून सापडला नसून रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात त्याचा शोध सुरू होता.
मृतांमध्ये स्वप्नील (११), तेजस (१२), साहिल (१०) यांचा समावेश आहे. तर नऊ वर्षांची आरती सुदैवाने वाचली. या बालकांच्या मृत्यूनंतर गावावर शोककळा पसरली आहे.
First Published: Monday, April 15, 2013, 07:06