Last Updated: Monday, September 16, 2013, 11:33
www.24taas.com , झी मीडिया, सिंधुदुर्गउद्योगमंत्री नारायण राणे आणि काँग्रेसचेच आमदार विजय सावंत यांच्यातील साखर कारखाना उभारणीवरून निर्माण झालेला वाद शिगेला पोहोचलाय.
आमदार विजय सावंत यांच्या शिडवणेतल्या साखर कारखान्याला सहकार आयुक्तांची आधीच परवानगी मिळालीय. त्यामुळं हा साखर कारखाना सिंधुदुर्गात झाल्यास राणेंच्या ‘राणे व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड’चं साखर कारखाना उभारणीचं स्वप्न पूर्ण होणार नसल्यानं या दोघांमध्ये साखर कारखाना कोण उभारणार यातून वाद निर्माण झालाय.
विजय सावंत यांच्या शिडवणेतल्या जागेचं याच वादातून आज हवाई सर्वेक्षण होणार आहे. कारखाना उभारताना दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतर हे २५ किलोमीटर असावं लागतं. शिडवणेतल्या या कारखान्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडामध्ये डी. वाय. पाटील यांचा एक कारखाना आहे आणि या कारखान्याचं अंतर हे २५ किलोमीटरपेक्षा कमी आहे, असं नारायण राणेंचं म्हणणं आहे.
यातूनच आज फेर मोजणी होणारेय. या मोजणीला आमदार विजय सावंत यांनी विरोध केलाय. त्यामुळं जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, September 16, 2013, 11:31