Last Updated: Tuesday, April 2, 2013, 12:49
www.24taas.com, देवरूखदेवरूख नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत सत्ता प्रस्तापित केली आहे. या नपरपंचायतीमध्ये काँग्रेसनेही विजयाचे खाते खोलले आहे.
देवरूख ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. त्यानंतर जनता दलाने सत्ता काबिज केली होती. मात्र, देवरूखमधील राजकीय गणिते शिवसेनेने फोल ठरविल पुन्हा सत्ता काबिज केली आहे. शिवसेनेने १२ जागांवर स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागांवर विजय मिळविला तर काँग्रेसनेही एक जागा जिंकत खाते खोलले आहे.
खासदार नीलेश राणे यांना हा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. तर शेजराच्या गुहागरमध्ये राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीत काँग्रेसने सत्ता मिळविली. देवरूख , गुहागर, आणि कणकवली नगर पंचायतीच्या प्रत्येकी १७ जागांसाठी काल मतदान झाले होते.
First Published: Monday, April 1, 2013, 11:58