Last Updated: Sunday, December 15, 2013, 21:46
www.24taas.com, झी मीडिया, कल्याणआजपर्यंत अनेक लहान मोठ्या कारणांवरुन हत्या झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या पाहिल्या असतील पण ओव्हर टेक सारख्या शुल्लक कारणावरुन एखाद्याची हत्या कुणी करेल का? होय ओव्हर टेक करु दिला नाही म्हणून कल्याणमध्ये एका डॉक्टराची हत्या करण्यात आलीय.
कल्याणच्या रामबाग परिसरातील संतोषी माता रोडवरुन डॉक्टर मयूर मेहता आपल्या स्कूटरवरुन घराकडे चालले असताना एका बाईकवरुन तिघेजण त्यांच्या मागे होते... बाईकवर असलेल्या जयेश डोंगरे यानं आपल्याला पुढं जाऊ द्या, असं मेहता यांना सांगितलं. या गोष्टीवरुन मेहता आणि जयेश यांच्यात वाद झाला आणि वादाचं रुपांतर भांडणात होऊन जयेशनं मेहता यांना मारहाण करायला सुरुवात केली...
त्यातच त्यानं आपल्या जवळील चाकूनं मेहता यांच्या मांडीवर वार केला. लोकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि मेहतांना नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं. पण रक्तस्त्राव जास्त झाल्यानं डॉक्टर मेहता यांचा मृत्यू झाला. जयेश डोंगरे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मेहता यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार असून अशा शुल्लक कारणावरुन एका निष्पाप माणसाचा जीव गेल्यानं लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 15, 2013, 21:46