Last Updated: Saturday, December 8, 2012, 12:21
www.24taas.com, डोंबिवलीडोंबिवलीत दरोडेखोरांनी गोळीबार करीत दंडुकेधारी पोलिसाना चांगलाच गुंगारा दिला. घरफोडीच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्यांनी चार जणांना पोलिसांना तुरी दिली.
काल पहाटे घरफोडी करणाऱ्या चार बंदुकधारी दरोडेखोरांनी केवळ दंडुके जवळ असलेल्या पोलीसांवर फिस्तुल रोखून पळ काढला. सशत्र बंदूकधारी दरोडेखोर कुश इमारतीत घुसले. व बंद घर फोदुण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिकांनी टिळक नगर पोलिसांना खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांकडे शस्त्र म्हणून केवळ दंडुकेच असल्याने ते फरार झाले.
टोपी घातलेल्या चोराला पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, लपून बसलेल्या तीन दरोडेखोरांनी पोलिसांवर पाच राऊंड चालविले. त्यामुळे पोलीस चक्रावून गेले. याचवेळी चोरटे पळून जाण्यात यशस्वी झालेत. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. टिळकनगर पोलिसांनी चोरट्यांची स्विफ्ट कार जप्त केली असून त्यांचा शोध घेत आहेत.
First Published: Saturday, December 8, 2012, 12:19