Last Updated: Monday, December 10, 2012, 11:27
www.24taas.com, डोंबिवलीडोंबिवलीमध्ये रोड रोमियोंकडून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीमध्ये आणखी एका २४ वर्षीय गृहिणीची भरदिवसा छेडछाड झाल्याची घटना घडलीय. पोलिसांनी छेडछाड करणाऱ्या डॉक्टरला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे.
डोंबिवलीच्या उच्चभ्रू अशा लोढा हेवन मधील चंद्रेश ओयासेस इमारतीमध्ये राहणारी २४ वर्षीय गृहिणी शनिवारी नेहमीप्रमाणे तिच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी बस थांब्यावर गेली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याच इमारतीत राहणारा डॉ. ओम प्रकाश मिश्रा तिला येता-जाता छेडत असे, असे त्या महिलेने सांगितले.
शनिवारी देखील डॉ. मिश्राने या महिलेला भर रस्त्यात बसस्टॉपवर छेडलं. मात्र, यावेळी तिने विरोध केला. ही बाब पतीला सांगितली. डॉ. मिश्राने तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
First Published: Monday, December 10, 2012, 11:27