पतीच्या प्रेयसीवर पत्नीनेच घडवला बलात्कार, Dombivali, Kharghar, rape, immoral relations

पतीच्या प्रेयसीवर पत्नीनेच घडवला बलात्कार

पतीच्या प्रेयसीवर पत्नीनेच घडवला बलात्कार
www.24taas.com,ठाणे

पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीला वाचविण्यासाठी पत्नीनेच त्याच्या प्रेयसीवर तिघांना सामूहिक बलात्कार करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. महिलेनेच बलात्काराचा कट रचल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एका महिलेनेच १९ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा कट रचल्याची किळसवाणी घटना डोंबिवलीत घडलेय. पतीचे तरूणीसबोत अनैतिक संबंधांच्या कारणावरून एका महिलेने आपला भाऊ आणि त्याचे तीन सहकारी यांच्या मदतीने हा प्रकार घडवून आणल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

याप्रकरणी महिलेसह तिची आई, भाऊ आणि अन्य एकाला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून बलात्काराचा आरोप असलेल्या तिघांचा शोध सुरू आहे.

२८ वर्षिय विवाहीता, तिची आई (५५), भाऊ (२५) आणि एक रिक्षाचालक (४४) यांना पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कार करणारे गोलू, बाल्या आणि विकास हे तिघे जण पसार झाले आहेत. पती जितू निशाद याचे या १९ वर्षीय तरुणीशी अनैतिक संबंघ होते.


जितूची या तरुणीशी ओळख तिच्या वडिलांच्या तळोजा येथील धाब्यावर झाली होती. चार महिन्यांपूर्वी तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्या वडिलांच्या संमतीने जितूने तिला मानपाडा कोळेगाव परिसरातील एका खोलीत आणून ठेवले होते. याची माहिती ममताला मिळताच तिने आई वसुबाई आणि भाऊ संतोष यांच्या मदतीने या तरुणीस जबर मारहाण करीत घराबाहेर काढले. यानंतर, जितूने या युवतीला बदलापूरमधील एका खोलीवर नेऊन ठेवले. ममताने तिथेही जाऊन तिला जबर मारहण केली. तिथून तिला रिक्षात कोंबून तिच्या आजदेपाडामधील माहेरच्या घरात डांबून ठेवले, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली.

मध्यरात्रीच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी पीडित तरुणीला गाडीवर बसवत खारघर परिसरात नेले आणि तिथे आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, पहाटेच्या सुमारास तिला पुन्हा आजदेपाडा येथे आणून सोडले. आज सकाळी पीडित तरुणीने घरातील सर्वांची नजर चुकवून स्वत:ची सुटका करून घेतली. नंतर, मानपाडा पोलीस ठाणे गाठून झाल्या प्रकाराची तक्रार दाखल केली.

First Published: Monday, April 22, 2013, 14:01


comments powered by Disqus