मनसेकडून डोंबिवलीतील टोल नाक्याची तोडफोड, dombivali tollNaka todfod

मनसेकडून डोंबिवलीतील टोल नाक्याची तोडफोड

मनसेकडून डोंबिवलीतील टोल नाक्याची तोडफोड
www.24taas.com, झी मीडिया, कल्याण

डोंबिवलीच्या काटई टोलनाक्यावर मनसेनं टोल बंद करण्याच्या मागणीसाठी तोडफोड केलीय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी केबिनची तोडफोड केलीय. तोडफोड करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.

डोंबिवलीचा काटई टोळ नाक बेकायदेशीर आहे. असे असताना येथे टोल वसुली कशी केली जाते. या टोल नाक्यावर MRTP अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही बिनदिक्कत टोळ वसुली होत असल्याच्या निषेधार्थ आज मनसे आमदार रमेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर तोडफोड करत टोल नाका बंद पाडला.

या तोडफोडप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आमदार रमेश पाटील यांसह कार्यकर्त्यांना अटक केली आहे. टोल नाक्यावर मोठा पोलीसबंदोबस्त वाढविण्यात आला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 16, 2014, 12:49


comments powered by Disqus