मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाची नगरसेविकेच्या गाडीला धडक Drunk police`s car bumps on corporator`s car

मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाची नगरसेविकेच्या गाडीला धडक

मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाची नगरसेविकेच्या गाडीला धडक
www.24taas.com, झी मीडिया, बदलापूर

बदलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांनी मद्यदुंध अवस्थेत बदलापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका आरती टांकसाळकर यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

मोहन कांबळे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होते. नगरसेवका आरती टांकसाळकर यांच्या गाडीत बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वृषाली मेणे, आणि नगरसेविका स्नेहल पातकरही होत्या. टांकसाळकर यांची गाडी रस्त्यावर उभी होती. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणा-या कांबळेंनी गाडीला धडक दिली. दुर्घटनेनंतरही मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कांबळे यांना नागरिकांनी धन्वंतरी रुग्णालयात नेलं. पण रक्ताचे नमुने द्यायला नकार देऊन कांबळे यांनी हॉस्पिटलमध्येही प्रचंड गोधळ घातला.

पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात मोटार व्हेहिकल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच कांबळेंवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 8, 2013, 17:48


comments powered by Disqus