Last Updated: Friday, March 1, 2013, 20:42
www.24taas.com, पेणदारु संसाराची राखरांगोळी करते. अनेक जणांचे संसार दारुपायी उद्धस्त झालेत. पण तरीही व्यसनाचा अतिरेक करणा-यांचे डोळे उघडत नाही. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वाशी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
उमेश पाटील या दारुड्या पतीनं आपली पत्नी चैताली आणि १६ महिन्यांच्या मुलीला जाळून मारलं. पती-पत्नीमधल्या वादाची शिक्षा निष्पाप चिमुरडीलाही भोगावी लागली. पत्नीचं नाव चैताली तर बालिकेचं नाव आर्या आहे. घटनेच्या १५ दिवसांपूर्वीच पती उमेश पाटील यानं जाळून टाकण्याची धमकी दिली होती.
गंभीर बाब म्हणजे आरोपीनं निर्विकार चेहऱ्याने राहत्या घरापासून जवळच असलेल्या एका शेतात तुमची मुलगी मरून पडली आहे, असं आपल्या सासू, सास-यांना सांगितलं. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पतीला तातडीनं अटक केली आहे.
First Published: Friday, March 1, 2013, 20:42