शिळफाट्याला खड्ड्यांमुळे बंपी राईडचा अनुभव! Enjoy Bumpy Ride courtesy Potholes

शिळफाट्याला खड्ड्यांमुळे बंपी राईडचा अनुभव!

शिळफाट्याला खड्ड्यांमुळे बंपी राईडचा अनुभव!
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

कल्याण डोंबिवली मुंब्रा बदलापूर विभागाला नवी मुंबई आणि मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे शीळफाटा ते महापे रस्ता. पण दरवर्षी या अतिमहत्त्वाच्या रस्त्याची चाळण होते. प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. सध्याही या रस्त्यावर चालकांना बंपी राईड अनुभवायला मिळत आहे.

महापे ते शीळफाटा हा सहा किलोमीटरचा मह्त्त्वाचा रस्ता. या रस्त्यावर मुंब्रा डोंबिवली ते अगदी बदलापूरपर्यंतचा मुंबई नवी मुंबईशी संपर्क अवलंबून आहे. त्यातच इथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांचीही वाहतूक होते. मात्र नेमेची येणा-या पावसाळ्यात या रस्त्याची अक्षरशः चाळण होते. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची वाहतूक होते. पण खड्ड्यांमुळे इथून वाहतूक करणं कठीण झालंय. त्यातच खराब रस्त्यामुळे गाडी बंद पडणं, टायर खराब होणं असे प्रकार घडतात. इथून महापे एमआयडीसीत नोकरी करणा-यांपैकी अनेक जण बाईकवरून येजा करतात. अनेक बाईकस्वारांना इथे अपघातांचा सामना करावा लागलाय.

हा रस्ता एमआयडीसीच्या अखत्यारीत येतो. पण सध्या इथे सुरू असलेलं काँक्रीटीकरणाचं काम एमएमआऱडीए करत आहे. हे काम कूर्मगतीनं सुरू आहे. त्याचाही फटका इथल्या वाहतुकीला बसतोय. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेलं हे काम लवकर संपवावं अशी मागणी करण्यात येत आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 27, 2013, 17:47


comments powered by Disqus