पनवेल हत्याकांड प्रकरणी एक अटकेत, Estate agent murder in panvel

पनवेल हत्याकांडप्रकरणी एक अटकेत

पनवेल हत्याकांडप्रकरणी एक अटकेत
www.24taas.com,पनवेल

पनवेलजवळच्या फार्महाऊसवरील हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलयं. हत्या करणाऱ्या चंद्रकांत वाघमारे याला पोलिसांनी अटक केली.

पैशांचा पाऊस पाडतो असं अमिष दाखवून चौघांची हत्या करण्यात आलीये. या प्रकरणी चंद्रकांत वाघमारे याला पोलिसांनी अटक केलीये. तो रसायनीजवळच्या मोहपाड्याचा रहिवासी आहे. त्यानं पैशांचा पाऊस पाडतो असं अमिष दाखवून चौघांना शिरवलीजवळच्या फार्महाऊसवर बोलावलं होतं.

तिथं त्यानं चौघांचीही हत्या केली. चौघांनी आणलेल्या पैशांसह पोबारा केला. पोलिसांनी या प्रकरणी चंद्रकांत वाघमारेला अटक केलीये. अंधश्रद्धेतून चौघांनी आपला जीव गमावलाय.

First Published: Monday, November 19, 2012, 12:53


comments powered by Disqus