फेसबुक प्रकरण : सेनेचा पालघर बंद , facebook comment issue

फेसबुक प्रकरण : सेनेचा पालघर बंद

फेसबुक प्रकरण : सेनेचा पालघर बंद
www.24taas.com, पालघर

शिवसेनेनं पुकारलेल्या पालघर बंदला सुरुवात झालीये. सकाळपासून बाजारपेठेतली दुकानं उघडलेली नाहीत. शहरातली रिक्षा आणि इतर खासगी वाहतूक पूर्णपणं बंद आहे. आज सार्वजनिक सुट्टी असल्यानं शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. पोलिसांचा क़डेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
.
पालघर फेसबुक प्रकरणी सरकारनं सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेनं पुकारलेल्या पालघर बंदला शांततेत सुरूवात झालीये. फेसबुक कॉमेंट प्रकरणी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक रवींद्र सेनगावकर आणि पालघरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचं काल निलंबन करण्यात आलं होतं. तसंच पालघरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रा. गो. बागडे यांची बदली करण्यात आलीये. याविरोधात शिवसेनेनं पालघर बंदची हाक दिलीये.

शिवसेनेकडून सरकारच्या निर्णयाचा निषेध करीत जनतेला बंदमध्ये सामील होण्याचं आवाहनही करण्यात आलंय. फेसबुक कमेंट्स प्रकरणी पोलीसांनी केलेली कारवाईही योग्यचं होती. त्यामुळे पोलिसांवर केलेली कारवाई चुकीची असल्याचंही बोललं जातंय.

First Published: Wednesday, November 28, 2012, 10:16


comments powered by Disqus