पाचवीतल्या मुलीची आत्महत्या, अधीक्षकाला अटक Fifth Std. girl commits suicide

पाचवीतल्या मुलीची आत्महत्या, अधीक्षकाला अटक

पाचवीतल्या मुलीची आत्महत्या, अधीक्षकाला अटक
www.24taas.com, उल्हासनगर

उल्हासनगरमधल्या राजर्षी छत्रपति शाहू महाराज या मागासवर्गीय वस्ती शाळेच्या अधीक्षकाला अटक केली आहे. शाळेतल्या पाचवीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिक्षकाला अटक केली.

ज्योत्स्ना सोनावणेनं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या मृतदेहाजवळ अधिक्षकाचा फोटो तुकडे केलेल्या अवस्थेत सापडला. शिवाय तिच्या मोबाईलवर अधिक्षक विजयराज पाटील याचे एसएमएसही पोलिसांना आढळले.



दरम्यान मृत मुलीची बहीण आणि आईनं पोलीस ठाण्यात तक्रार करुनही पोलिसांनी पाटीलला अटक करायला २४ तास लावले. पाटील ज्योत्स्नाला बागेत फिरायला न्यायचा. त्यानं तिला मोबाईलही घेऊन दिल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.

First Published: Thursday, March 21, 2013, 20:43


comments powered by Disqus