भिंवडीत कपडा कंपनीला भीषण आग Fire breaks out at Bhiwandi dyeing factory

भिंवडीत कपडा कंपनीला भीषण आग

भिंवडीत कपडा कंपनीला भीषण आग
www.zee24taas.com, झी मीडिया, भिंवडी,

भिवंडीमधील बालाजी कंपाऊडमधील तपस्या डाईंग या कापड कंपनीला सोमवारी रात्री उशीरा अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांच नुकसान झालंय.

या आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाचे ८ ते १० बंब घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तरीही आग नियंत्रणात न आल्यानं अंबरनाथ तसंच कल्याण डोंबिवलीतल्या अग्निशमन दलासही प्राचरण करण्यात आलं होतं.


या भागातील रस्ते अरुंद असल्यानं आग विजवण्यात अडथळे येत होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शेकडो रहिवाश्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.


या आगीचं आणखी काही कारण आहे का याचीही चर्चा आता नागरिकांमध्ये सुरु झालीय. याबाबत नारपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 25, 2014, 13:19


comments powered by Disqus