Last Updated: Tuesday, February 11, 2014, 07:42
www.24taas.com, झी मीडिया, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अग्निशमन सेवा चक्क खाजगी शाळेच्या संस्थेच्या कार्यक्रमात मैदान धुण्यासाठी वापरली जात असल्याचं झी मीडियानं उघडकीस आणलंय.
डोंबिवलीच्या रामनगर परिसरातील चंद्रकांत पाटकर या खासगी विद्यालयाचे मैदान धुण्यासाठी महानगर पालिकेच्या अग्नीशमन दलाच्या बंबाचा वापर करण्यात आला.
संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी हे मैदान धूण्यात आलं. मात्र यासाठी खासगी गाडीचा वापर नकरता चक्क अग्निशमन दलाचा बंब वारण्यात आला.
याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकार्यांना विचारलं असता त्यांनी कॅमे-यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र संस्था चालकांकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आपली चूक कबूल करत जाहीर माफी मागितली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 10, 2014, 17:50