Last Updated: Monday, May 13, 2013, 11:19
www.24taas.com, झी मीडिया, डोंबिवलीडोंबिवली MIDC परिसरातील केमस्टार कंपनीला भीषण आग लागलीय. या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत.
केमस्टार कंपनी ही कॉस्मेटीक्स प्रोडक्स बनवणारी कंपनी आहे. आगीमुळे MIDC परिसरात सर्वत्र धूराचे लोट पसले असून काही स्फोटांचे आवाज आल्याचंही वृत्त आहे.
आता पर्यंत आगीत चार कर्मचारी जखमी झाल्याचं वृत्त असून अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालंय. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 13, 2013, 09:35