उरणमध्ये गोदामाला आग fire in Godown

उरणमध्ये गोदामाला आग

उरणमध्ये गोदामाला आग
www.24taas.com, पनवेल

पनवेल-उरण मार्गावरील जासई गावाजवळच्या आकृती वेअर हाऊसच्या गोडावूनला आज दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये रबर आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा मोठा साठा करण्यात आला होता.

गोडावूनच्या आसपासच्या भागातील गवत जाळण्यासाठी आग लावण्यात आली होती. मात्र या आगीनं गोडावून जळून गेले. आग विझविण्यासाठी सिडको आणि जेएनपीटी अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी दोन तासानंतर आग आटोक्यात आणली.

सुदैवानं या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे.

First Published: Saturday, December 1, 2012, 23:13


comments powered by Disqus