धमकी देणाऱ्यांना मी माफ करतो : आदित्य forgiven to threatener - aditya Thackeray

धमकी देणाऱ्यांना मी माफ करतो : आदित्य

धमकी देणाऱ्यांना मी माफ करतो : आदित्य

WWW.24TAAS.COM, झी मीडिया, सिंधुदुर्ग


धमकी देणाऱ्यांना मी माफ करतो, असं युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गात म्हटलं आहे. नितेश राणे यांचं नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आदित्य ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौ-यावर आहेत. शिवसैनिकांना हात लावला तर गाठ माझ्याशी आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

या दौ-यात सिंधुदुर्गाच्या विविध भागात त्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय. यादरम्यान तरुणांशीही ते संवाद साधणार आहेत. त्यांचा हा दौरा सर्वार्थानं यशस्वी होण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करतायत.

दोन दिवसांपूर्वी यूनियनच्या वादातून स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यात राणे समर्थक गंभीररित्या जखमी झाले होते.

मुंबईतल्या या राड्याचे पडसाद आदित्य यांच्या सिंधुदुर्ग दौ-यात उमटण्याची शक्यता आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 22, 2014, 13:42


comments powered by Disqus