Last Updated: Saturday, August 18, 2012, 21:19
www.24taas.com,रत्नागिरीसहलीसाठी आलेल्या तरूणांवर लाटा जीवावर बेतल्या. गणपतीपुळे समुद्रात सहाजण बुडाले असून यापैकी चार जणांचे मृतदेह हाती लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
सहलीसाठी आलेल्या सोलापूर, शहापूर, पनवेल या भागातील काहीजण गणपतीपुळे समुद्रावर गेले होते. यावेळी आलेल्या प्रचंड लाटेत सहाजण वाहुन गेले. यापैकी चार जणांचे मृतदेह सापडले. अद्याप दोन जण बेपत्ता असून जीवरक्षक दलाचे जवान स्थानिक पोलीस आणि गावक-यांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहेत. मात्र, त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.
गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक असून सुद्धा अनेक वेळा पर्यटक पाण्यात उतरतात. येथे लावण्यात आलेल्या सूचनांकडे डोळे झाक करण्यात येत असल्याने अशा घडना वारंवार घडतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
First Published: Saturday, August 18, 2012, 21:18