Last Updated: Monday, July 29, 2013, 23:46
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईगणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना मध्य रेल्वे पावली आहे. गणेशोत्सवासाठी 4 ते 22 सप्टेंबर या कालावधीत रेल्वेच्या 120 जादा फे-या यंदा धावणार आहे.
येत्या 31 जुलैपासून जादा गाड्यांसाठीचं आरक्षण सुरू होणार आहे. यापैकी 64 गाड्या कुर्ला टर्मिनसवरून, 42 गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनसहून तर 16 गाड्या दादरहून धावणार आहेत. दादर-सावंतवाडीदरम्यान दररोज अनारक्षित ट्रेन जाणार आहे.
या काळात प्रत्येक गुरूवारी कुर्ला टर्मिनस ते मडगाव अशी खास फुल्ल एसी ट्रेनही धावणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, July 29, 2013, 23:46