Last Updated: Tuesday, June 25, 2013, 23:33
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबईनवी मुंबईत दहा वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. त्या मुलीचा आज मृत्यू झालाय.
तुर्भे हनुमान नगरमध्ये राहणा-या दहा वर्षांच्या मुलीवर १६ जूनला चौघांनी बलात्कार केला होता. त्यानंतर या मुलीवर उपचार सुरु होते. त्याचदरम्यान तिचा मृत्यू झालाय. या परिसरातली चार दिवसांतली बलात्काराची ही दुसरी घटना आहे. या चौघा नराधमांनी मुलीला दहा रुपयांचं आमिष दाखवलं होतं.
बलात्कार करणारी ही मुलं १३ ते १६ वयोगटातली आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांची चौकशी करण्यात येतेय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 25, 2013, 23:33