Last Updated: Monday, January 20, 2014, 22:53
www.24taas.com, झी मीडिया, वसईलिफ्ट देण्याचं कारण सांगून वसईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर संबंधित मुलीची हत्याही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या श्वान पथकाने थेट आरोपीचं घर गाठल्याने, आरोपीविरोधात सबळ आणि स्पष्ट पुरावे हाती आले आहेत.
बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचं नाव राहुल तुंबडा असं आहे. राहुलने १६ जानेवारी रोजी वसईतल्या कामन-शारजा रोडवर लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. रस्त्यावर कुणीही नसल्याचा फायदा राहुलने घेतला, गाडी झुडूपात नेऊन बलात्कार केला. मुलीने याचा जोरदार प्रतिकार केला, आरडाओरड केली, हे पाहून आरोपीने तिचा गळा दाबून हत्या केली.
हत्येचं गूढ उकलण्यात श्वान पथकानं मोठी जबाबदारी पार पाडली आणि आरोपीचं घर गाठलं. दररोज शाळेतून येणारी मुलगी घरी न परतल्याने पालक मात्र बेचैन होते. आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी कानावर आल्यानंतर या मुलीच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
First Published: Monday, January 20, 2014, 22:53