सोने, पैसे नव्हे तर नवी मुंबईत चक्क कांद्याची चोरी, Gold, money is not stolen but the theft of onions in Navi Mumbai

सोने, पैसे नव्हे तर नवी मुंबईत चक्क कांद्याची चोरी

सोने, पैसे नव्हे तर नवी मुंबईत चक्क कांद्याची चोरी
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

सध्या पेट्रोलपेक्षा कांद्याला भाव आलाय. कांद्याचा भाव गगनाला गेल्याने चक्क चोरांनी सोने, पैसे याकडे दुर्लक्ष करून चक्क कांद्यावर डल्ला मारने सुरू केलेल. अशीच एक घटना नवी मुंबईत उघडकीस आली.

चोरट्यांनी कांद्याकडे मोर्चा वळविला आहे. एपीएमसीसह इतर मार्केटमध्ये वारंवार चोरीच्या घटना होत आहेत. १५ दिवसांमध्ये तब्बल एक टन कांदा चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. याविषयी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

देशात कांदाटंचाई सुरू आहे. कांद्याचा भाव ६० ते ९० रूपयांदरम्यान आहे. मागील चार महिन्यांपासून बाजारभाव सातत्याने वाढत आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये कांदा ४० ते ५५ रुपये तर किरकोळ मार्केटमध्ये ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे. सोन्याचा भाव आल्यामुळे चोरट्यांनीही आता कांद्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. एपीएमसीमधील दोन दुकानांमधील १४ गोण्या चोरीला गेल्यात. ८२८ किलो वजनाच्या मालाची किंमत ६२,१०० रु. एवढी आहे.

बाजार समितीमध्ये चोरीच्या किरकोळ घटना नियमितपणे होत आहेत. उघड्यावर ठेवलेल्या गोण्यांमधील माल चोरला जात आहे. गुरुवारी मनोज आवळे हा तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 9, 2013, 20:08


comments powered by Disqus