हर्षलानं रोडरोमिओला शिकवला चांगलाच धडा , harshala more beat a road romeo

हर्षलानं रोडरोमिओला शिकवला चांगलाच धडा

हर्षलानं रोडरोमिओला शिकवला चांगलाच धडा
www.24taas.com, ठाणे

रस्त्यावर तरुणींची छेडछाड ही जणू काही आता नेहमीचीच गोष्ट झालीय. हाच अनुभव एका राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूनलाही आला. मात्र, तीनं या प्रसंगाला धाडसानं उत्तर देत एक धडाच तरुणींना दिलाय.

गेल्या काही दिवसांत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत. मीडियानंही या घटनांची गंभीर दखल घेतलीय. लैंगिक छळ, बलात्कार, घरगुती अत्याचार याबरोबच छेडछाड हाही गंभीर मुद्दा बनत चाललाय. रोडरोमिओंच्या टवाळकीला सामोरं जावं लागल्यानंतर काही तरुणी भांबावून जातात. मात्र, राष्ट्रीय कबड्डीपटू हर्षला मोरेनं मात्र छेड काढणाऱ्या दोन मवाल्यांना चांगलाच धडा शिकवलाय. हर्षला आपल्या मैत्रिणीला सोडण्यासाठी स्टेशनवर गेली असताना रस्त्यावरील दोन मवाल्यांनी तिची छेड काढली.

मात्र, यावेळी न डगमगता हर्षलानं या मवाल्यांचा मुकाबला केला इतकच नाही तर तीनं या मवाल्यांना पूलावरुन खेचत खाली आणलं. त्यानंतर त्यापैकी एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला. दुसऱ्याला मात्र हर्षलानं पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनीही हर्षलाच्या या धाडसाचं कौतुक केलंय.

First Published: Wednesday, April 3, 2013, 12:48


comments powered by Disqus