रत्नागिरी - सिंधुदुर्गात वादळी पावसाचा तडाखा, In Ratnagiri - sindhudurg windy rain pelt

रत्नागिरी - सिंधुदुर्गात वादळी पावसाचा तडाखा

रत्नागिरी - सिंधुदुर्गात वादळी पावसाचा तडाखा
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागाला आज सायंकाळी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. विजांच्या गडगडाटासह रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तर संध्याकाळी परत पावसाने हजेरी लावत सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडाखा दिला.

चिपळूण शहरात अचनाक सोसाट्याच्या वाऱ्यानं अनेक घरांवरचे पत्रे उडाले. तर या अवकाळी पावसानं आंब्याचं मोठं नुकसान झालाय. तर विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसानं अनेक ठिकाणचा वीज पुरवठा सुद्धा खंडीत झाला. कोकणात सध्या अवकाळी पावसाच्या हजेरीचे सत्र सुरुच आहे.

काल तळकोकणात सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्याला वादळी पावसाने अक्षरश: झोडपले होते. यामुळे दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब, घरे आणि झाडांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच प्रमाणे काल रात्री रत्नागिरीत खेड मधील काही गावात गारांसह पाऊस पडला.

आज संध्याकाळी परत पावसाने हजेरी लावत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडाखा दिला. मेघ गर्जनांसह कोकणात वादळी पावसाने थैमान घातले. अद्यापही याठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळतंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 7, 2014, 18:43


comments powered by Disqus