डान्सबारमध्ये घुसून NCP कार्यकर्त्यांनी केली तोडफोड, issue about dance bar in Ulhasnagar

डान्सबारमध्ये घुसून NCP कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

डान्सबारमध्ये घुसून NCP कार्यकर्त्यांनी केली तोडफोड
www.24taas.com, उल्हासनगर

उल्हासनगर शहरातील शिवाजी चौक भागात असलेल्या दीपक या डान्सबारमध्ये बुधवारी रात्री तोडफोड करण्यात आली. साधारण दीडशे कार्यकर्ते रात्री या बारमध्ये घुसले आणि त्यांनी तुफान तोडफोड केली.

उल्हासनगर शहरातील शिवाजी चौक भागात अनिधिकृतरीत्या दीपक डान्सबार सुरु होता, एन सी पी कार्यकर्त्यांनी अनेक वेळा या डान्सबार विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करूनही पोलीस कारवाई करत नव्हते, त्यामुळे आज रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास १०० ते १५० पुरुष आणि महिला कार्यकर्ते बार मध्ये घुसले आणि त्यांनी बार मध्ये तोड फोड करण्यास सुरवात केली.

एन सी पी कार्यकर्त्यांनी हॉटेल मधील टेबल खुर्च्या आणि काचेच्या सामानाची तोडफोड केली. या गोंधळा नंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनतर पोलिसांनी बार मध्ये नाचणाऱ्या २० ते २५ मुलीना तब्यत घेतले, या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

First Published: Thursday, February 7, 2013, 15:41


comments powered by Disqus