Last Updated: Tuesday, October 30, 2012, 19:19
www.24taas.com,नवी दिल्लीकोकणातील राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम फेब्रुवारीनंतर सुरु होणार असल्याचं अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर के. सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. अणु ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु होण्यास आता कुठलाही अडथळा नसल्याचे ते म्हणाले.
भारताची न्युक्लीअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फ्रान्सची अरेवा या कंपन्यांमध्ये करारासंदर्भातली बोलणी अंतिम टप्प्यात आहे. हे सोपस्कार ३-४ महिन्यात पूर्ण होतील आणि कामांना सुरुवात होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात १६०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या उभारल्या जाणार आहेत. तसंच भविष्यात आणखी अशा चार अणुभट्य़ांपासून वीजनिर्मीतीचा प्रस्ताव आहे.
भूसंपादन आणि प्रकल्पापासूनचे धोके यावरुन मोठी आंदोलनं झाली होती. मात्र अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांकडून हे वक्तव्य आल्याने प्रकल्पाचं काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
First Published: Tuesday, October 30, 2012, 18:20